Loading...

Follow Charanti & Chai on Feedspot

Continue with Google
Continue with Facebook
or

Valid
Charanti & Chai
My Wanderlust Soul Discussing Some Books, Travels, Photos with a Cuppa of..
+
विलास सारंग आणि त्यांची लेखनशैली ह्याबद्दल मी एकूण होते; पण कधीही वाचण्याचा योग आला नव्हता. त्यामुळे एन्कीच्या राज्यात हे त्यांचं मी वाचलेलं पहिलचं पुस्तक, पण अनोळखी लेखक असल्याचं अजिबात जाणीव करून देत नाही. पुस्तकाचा नायक हा एक प्रोफेसर आहे, अमेरिकेत राहून आपली डिग्री पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. पण ती पूर्ण झाल्यावर तो नोकरीच्या निमित्ताने इराकमध्ये स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतो. ही एकच गोष्ट त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरते. इतर भारतीय लोकांसारखं शिक्षण पूर्ण करून एखादी बऱ्यापैकी नोकरी करून टिपिकल अमेरिकन सुखवस्तू आयुष्य जगण्याचा नायकाचा मनोदय नाही. त्यापेक्षा सर्वच बाबतीत कठीण पर्याय तो निवडतो- इराकमध्ये बसरा युनिव्हर्सिटी मध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करण्याचा. जरी तो मनाच्या अस्वस्थतेवर मात करण्यासाठी किंवा कायमस्वरूपी आयुष्याचा निर्णय घेण्यासाठी स्टॉप-गॅप अरेंजमेंट म्हणून ही नोकरी धरतो. तरी इराकची राजकीयदृष्ट्या अस्थिर आणि लष्कराच्या अधीन असलेली राज्यव्यवस्था त्याला चहूबाजूंनी घेरते. ह्या अस्वस्थ वर्षांची नोंद म्हणजेच ही कादंबरी. कथाविषय, घटनाक्रम आणि मुख्य म्हणजे इराकच्या पार्श्वभूमीवर उलगडत जाणारे कथा नायकाचे मनोव्यापार यामुळेच ही अतिशय लक्षवेधी कादंबरी ठरते. जरी प्रत्यक्षात ह्या कादंबरीचा तरी नाही पण विलास सारंग यांचा उल्लेख ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ मध्ये येतोच. लेखकाने वाचलेल्या लेखकांचा प्रभाव प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्याच्या लेखनावर पडतो आणि प्रणव सखदेवांच्या लेखनातून आपल्याला ते जाणवते. तशी तर ही कमिंग-ऑफ-एज कादंबरी; समीर आणि त्याच्या भवतालाची. ही जितकी त्याची गोष्ट आहे तितकीच ती सलोनी, सानिका आणि चैतन्य या त्याच्या आयुष्यात आलेल्या त्याच्या मित्रांची देखील आहे. पण चैतन्य अचानक जाण्याने आलेली पोकळी, सलोनी आणि तिची मानसिक आंदोलने, सानिकाचं कथेतील प्रयोजन अशा विविध पातळ्यांवर ही कादंबरी फिरत राहते. ह्या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त करड्या होतात आणि आपल्याला जणू त्या तळ्याच्या पोटात खेचून नेऊ पाहतात. ह्यामध्ये अरुण आणि दादूकाका ह्यांच्या उपकथानकांची भरताड आहेच, ज्याचा समीरला अफू आणि दारूची दीक्षा देण्यापलीकडे फारसा उपयोग नाहीच. त्याचं घर सोडून भटकणं किंवा हिमालयात जाणं देखील वाचकाला बुचकळ्यात पाडतं. त्यामुळेच मनावर करड्या म्लान रंगाचे ठिपके उडवण्यापलीकडे ह्या पुस्तकाचा प्रभाव पडत नाही आणि एकूणच खूप वाचूनही काहीच वाचल्याचं फिलिंग येत नाही. मराठी नवसाहित्य पुढे नेऊ पाहण्याच्या लेखकाकडून हे निराशाजनक आहे. शेवटी इतकंच- विलास सारंग देर सही लेकीन अजूनही काही पुस्तक वाचून पहावीत, कदाचित काही नवीन कवडसे सापडतील. The post एन्कीच्या राज्यात आणि काळेकरडे स्ट्रोक्स appeared first on Charanti & Chai. ..read more
Charanti & Chai
by Shilps
- 1w ago
Ushering into 2020 with a strong urge to read more. Well, I won’t call it a New Year Resolution per se; as they are hard to keep. But, ..read more
Collection of short stories is actually one of my favourite forms of fiction; primary because in one book you get to read about more than ..read more
Charanti & Chai by Shilps - 1w ago
Here’s the photo which I clicked few years back on my travels to the princely state of Rajasthan. These are elephant rides going up to ..read more
Charanti & Chai
by Shilps
- 1w ago
Yes, it’s been a while since I wrote or read or listened to a good book. So, here I am now; with a book which talks much about one’s ..read more
Charanti & Chai
by Shilps
- 1w ago
I picked up this book with some expectations about the author – unusual subject choices for his novels, ability to seamlessly mix ..read more
The content is interesting, the characters are charming and the language is impressive. The storyline is quite simple and without much ..read more
Charanti & Chai
by Shilps
- 1w ago
पुस्तकाच्या पृष्ठभागावर दिसणारी विहीर हि फक्त ह्या घराचंच नाही त्या घरामध्ये राहण्याऱ्या माणसांचं देखील प्रतिक आहे. थांग न लागणारी विहीर आणि एकमेकांना धरून तगू पाहणारी माणसे खरंतर माणसाच्या अथांग मनोव्यापाराचं रूपक म्हणून सामोरी येतात. हि कथा घडते तर तशी कोकणात, जिथे त्यांचं वडिलोपार्जित घर आणि वावर आहे. मोठं नावाजलेलं तालेवार घराणं, पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध  आणि दबदबा  असणारं.पण एकेदिवशी भानूकाका येतो किंवा खरेतर येत  नाही,  तो दुसराच कुणी म्हणून येतो आणि इथूनच भूगावतील तालेवार देशमुखांच्या घराला हादरे बसायला सुरुवात होते. याची सुरुवात आधीच म्हणजे मुबईतून झालीये हे समजतं , जेव्हा काकू मागोमाग दाखल  होते. त्यानंतर घरातले हास-भास, एकामागोमाग घडणारे विचित्र योगायोग; खासकरून भिवलीचा वावर आणि काकूचं बदलणारं स्थान- हे सगळं फारच ओघवत्या पण ठाशीव पध्दतीने मांडलेलं आहे आणि लेखक आपल्याला ह्यात बऱ्यापैकी गुंगवून टाकतो, तिथून पुढे कर्णिक प्रकरणापर्यंततरी खास एका बैठकीत संपवावी अशी ही कादंबरी आपल्याला बांधून ठेवते. सगळ्यांनी येनकेनप्रकारे डोंबिवलीला स्थायिक  होणं आणि त्या  पुढच्या घटना या आधीच्या कथेला वेगळ्या वळणावर नेतात. खानोलकरांची आठवण यावी इतक्या सशक्तपणे पडलेली गुढाची सावली हटून तिथे  आता  त्या घरापुढील झाडांची सावली पडू लागते. जयवन्त दळवींची आठवण करून देण्याऱ्या ह्या सावल्या मग एकमेकांत गुरफटत जातात आणि आपण मात्र त्या  गुंतवळ्यात हरवत नाही, याच कारण माझ्यामते कथेचा  फोकस आता नानूवर  केंद्रित  होतो. सुरुवातीपासून निवेदक असलेला , सगळ्यांच्या मनोव्यापाऱ्यांचा धांडोळा घेऊ पाहणारा  नानू  शेवटी आपल्या  मनाच्या  तळाशी  डोकावून पाहू  शकत  नाही. अण्णा -आई – काकू ह्या  इतिहासाची त्याच्याच  घरात पुनुरावृत्ती होणं आणि  त्याने शोधलेलं  गुलबकावलीचं रूपक, हा त्याच्या  अंतर्मनातील लालसेच्या, लोभाच्या गाभ्यापर्यंत आपल्याला घेऊन  जातो. मला  इथपर्यत आल्यावर पुन्हा  फिरून भिवली आणि भानूकाबद्दल का सांगायचं होत, त्याच प्रयोजन न समजल्याने थोडा रसभंग झाला  खरा पण तरीही ह्या गोष्टीने मला शेवटपर्यंत गुंतवून ठेवलं. एका नवीन  लेखकाची अतिशय  धाडसी विषयाला  स्पर्श करणारी, पण तरीही कुठेही बीभत्स न होता फार प्रभावी आणि खिळवून ठेवणारी कादंबरी म्हणून दंशकाल वाचनीय  आहे. मला नक्कीच  त्यांची पुढील  पुस्तके  वाचायला आवडतील.       The post दंशकाल appeared first on Charanti & Chai. ..read more
ब्र आणि भिन्न ह्या अतिशय उत्तम आणि लोकप्रिय कादंबरी लिहिण्याऱ्या लेखिकेची अजून एक कादंबरी म्हणून मला ह्या पुस्तकाबद्दल खूप उत्सुकता होती. पण आश्चर्य म्हणजे मला ह्या पुस्तकाचा रिव्ह्यू कुठेही नजरेस पडला नाही, त्यामुळे कदाचित मी हे पुस्तक वाचताना माझ्या मनाची अपेक्षा पाटी अगदी कोरी होती. पुस्तकाचं कथासूत्र थोडक्यात सांगायचं तर ही कहाणी आहे पदमजा सप्रे हया अभिनेत्रीची; जी मराठी नाट्यसृष्टी ते हिंदी चित्रपट असा अभिनयाचा प्रवास करते आणि त्याबरोबरच एक उन्मुक्त, स्वच्छन्दि वैयक्तिक आयुष्य जगते. ज्यांना मराठी साहित्य, नाटक आणि हिंदी चित्रपट ह्यांची थोडीबहुत माहिती आहे, त्यांना इथे बरीच खऱ्या जगातील साम्यस्थळे सापडू शकतील. हे कथानक सरळसोट असा प्रवास न करता, फ्लॅशबॅक / आठवणी/ आत्मचरित्र अशा वळणाने जाते. त्यामध्ये काही अपरिहार्य पुनरोक्ती आहेत, जी कधी कथा पुढे न्यायला मदत करतात किंवा वेगळया दृष्टीने तेच कथानक मांडतात. वाचक ठकी आणि तिच्या कथेत पुरता गुंततो, आपल्याला वाटतं की चला आला आता कथेचा शेवट; पण तिथेच येऊन कथा अशी अकल्पित वळण घेते की आपण क्षणभर थबकतोच. मला हे धक्कातंत्र आवडलं, अगदी सामान्य वाटणारी ही कादंबरी मग एका वेगळ्याच प्रतलात जाऊन पोहोचते. वरवर एका अभिनेत्री आणि तिच्या भवतालाची ही कथा मग आगळावेगळा आयाम दाखवते; हे खरंखुरं वास्तव आहे हे स्वीकारायला आपल्याला एक वाचक असूनही घटकाभर वेळ लागतो. माझ्यामते हेच ह्या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे की कुठलाही गाजावाजा न करता एक अतिशय महत्त्वाचा विषय मांडते. ज्यांना व्यक्ती आणि त्यांच्या मनोव्यापाराबद्दल वाचायला आवडेल त्यांच्यासाठी मी ह्या कादंबरीची शिफारस करेन.   The post ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम appeared first on Charanti & Chai. ..read more

Separate tags by commas
To access this feature, please upgrade your account.
Start your free month
Free Preview